Ad will apear here
Next
‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’
व्याख्यान देताना कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील. शेजारी लिंबाजीराव पाटील, गुणवंतराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, एम. के. कापूरकरशिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : ‘दूरदृष्टी असणाऱ्या जयवंतराव भोसले यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला डॉक्टर होता आले,’ असे उद्गार कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांनी काढले.

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कराड तालुका साखर कारखाना संघ आणि श्री गणेश शिवोत्सव मंडळ यांच्यातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना येथे झाला. या वेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन लिंबाजीराव पाटील, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, श्री गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव मुकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाल्या, ‘अप्पासाहेब म्हणजे एक कुशल नेतृत्व, ज्यांनी आपल्या अनुयायींना पुढे नेण्याचे काम केले. अप्पासाहेब म्हणजे फक्त राजकीय नेतृत्व नव्हते, तर सहकार, कला शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील महामेरू होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका घेऊन स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या खेडेगावातील सामान्य शेतकऱ्याच्या मुलीला डॉक्टर होता आले.’

स्त्री भ्रूणहत्या यावर प्रबोधन करताना ‘स्त्री’, ‘अस्तित्व’, ‘अहो असं का म्हणता’, ‘तू होतीस तेव्हा’, ‘हळद कुंकू’ या कविता सादर केल्या; तसेच ‘लेकी ग तू’ ही ओवी, ‘लेकी जन्माचा पाळणा’ व स्वरचित उखाणे सादर केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या प्रसंगी निर्मला पाटील, सर्जेराव पाटील, तानाजी पाटील, मोहन शेटे, सुरेश साळुंखे, यासीन संदे, एस. के. शिंदे आदींसह सर्व खातेप्रमुख, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत केले. एम. के. कापूरकर यांनी प्रास्ताविक केले. व्हाइस चेअरमन लिंबाजीराव पाटील यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZSIBF
Similar Posts
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांना अभिवादन कराड (सातारा) : कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यासाठी कृष्णा रुग्णालयाच्या प्रांगणात मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. य. मो
जयवंतराव भोसले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम कराड (सातारा) : कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले स्मारक समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान य
प्रकाश पिसाळ विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित कराड (सातारा) : भारत सरकार संलग्न क्रांती ग्रामविकास संस्थेमार्फत दिला जाणारा विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दैनिक ऐक्यचे सिनीअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व साप्ताहिक स्वप्ननगरीचे कार्यकारी संपादक प्रकाश पिसाळ यांना राष्ट्रीय स्तरावर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल देण्यात आला
जे. के. अॅकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू सातारा : नुकतेच निकाल लागले आहेत. दहावीनंतर नक्की काय करायचे, हा यक्षप्रश्न सोडवून विज्ञान शाखा असे उत्तर आले असेल, तर विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच तयारी करायला हवी. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी ‘जे. के. अॅकॅडमी’ची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अॅकॅडमीमध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language